मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटो अमेरिकेतल्या टाइम्स स्क्वेअर मधल्या चौकात झळकला आणि अचानक एक झुंबड उडाली.. म्हणजे नेमकी भानगड आहे तरी काय हे जाणून घेऊया...
मुख्मंत्रीपदाची शपथ घेतल्यांतर एकनाथ शिंदेंची चर्चा तशी गावोगावी झाली.. ती वेगवेगळ्या कारणांनी पण आज सकाळी पुन्हा एकदा चर्चा सूरू झाली त्याचं नेमकं कारण म्हणजे एकनाथ शिंदे ह्यांचा बॅनर झळकला... तसे एकनाथजी हे त्यांच्या राजकारणी खेळी आणि कामकाज ह्यांचा बाबतीत चर्चिले जातात... आता अमेरिकेतल्या सत्तेत जणु त्यांच्या कामाच्या, खेळीच्या इतकचं नव्हे तर चालीसाठी म्हणून त्यांची चर्चा होते की काय असे वाटू शकेल किंवा त्यांच्या अमेरिकेच्या राजकारणात प्रवेश होईल की काय अशा वावड्या उठायच्या आधीच क्लिअर करु की असं काही कारण नाही... तर त्यांचा बॅनर झलकायच तसं कारण काही विशेष नाही...
असा बॅनर हा झळकला त्याचा नेमकं कारण म्हणजे राहूल कनाल.. ज्यांनी हा फोटो खासदार श्रीकांत शिंदे यांनी हा फोटो झळकवला आहे.. आता त्याच्या मागे नेमकं कारण काय किंवा कोण दिसावं म्हणून हे करण्यात आलं ते मुख्यमंत्री किंवा त्यांचे पोस्टर बॉईज जे बॅनर वर झळकले तेच सांगू शकतील... पण खास गोष्ट म्हणजे अशा चौकातल्या बॅनरवर अमेरिकेच्या रस्त्यांवर तुमचा सुद्धा फोटो लागू शकतो.. त्यासाठी काही विशेष करावं लागतं असं काही नाही...
अगदीच असा बॅनर लागायला तूम्ही कोणी पुढारी किंवा बोर्डाच्या परीक्षेत पहिला यायला लागतच असं नाहीये... तिकडे झळकायला तुम्हाला फक्त १५० डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात १२ हजार पर्यंत खर्च करायला लागू शकतो तिकडे डिजिटल बॅनर्स असल्यामुळे तुम्हाला १५ सेकंदापासून ते १ मिनिट पर्यंत झळकायला पैसे मोजायला लागतात.
म्हणजे थोडक्यात काय तर मुख्यमंत्री न्यूयॉर्कच्या चौकात झळकले तर ह्यात काय विशेष कार्यामुळे नाही हे अशाच एका नेत्या मंडळीनी अगदी बॅनरबाजीचा रेटचार्टच टाकला...ज्यामुळे ह्यात विषेश अचंबा किंवा नवल करावं असावं असं काही नाही हे तिकडच्या नागरिकांना जस वाटावं असच काहीसं आपल्याला सांगायचा प्रयत्न ह्यांनी केला असावा.
मुळात बॅनरबाजीला विरोध किवा कुठे लागावा किंवा कोणी कुठे झळकाव असं काही आक्षेपार्ह नाही पण त्यासाठीची चर्चा होण्याईतकी कामे किंवा सोयी सुविधांची सुध्दा दखल घ्यावी अशा गोष्टी केल्या जाव्यात आणि त्यानंतर होणारी बॅनरबाजीला तितकच नागरिक डोक्यावर घेतील फरक इतकाच की अशा कामानंतर होणारी बॅनरबाजीला डोक्यावर घेण्यामागच कारण किंवा अभिमान हा वेगळाच असेल. म्हणून हा असा एखादा बॅनर लागला आणि मुख्यमंत्र्यांची आणि अमेरिकेशी नाव किमान नावापुरता का होईना लागलं..असच आता काही कामामुळे देखिल झळकुच द्यावं की.. अशी आहे ही भानगड मुख्यमंत्र्यांची न्यू यॉर्कच्या चौकात झळकायची भानगड.. कशी वाटली तुम्हाला ही भानगड.. अशीच आणखी कुठली भानगड ऐकायला किंवा वाचायला आवडेल हे कळवा... तो पर्यंत वाचत रहा आपली भानगड...
No comments:
Post a Comment